स्कुटीवरून आलेल्या दोन महिलांकडून १० किलो गांजा जप्त

Foto
सागर प्रकाशनचे साजवार्ता
Page No.: 6 Date: 29/10/2026
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. १७) मोठी कारवाई करत गांजा तस्करी करणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १० किलो १८४ ग्रॅम गांजासदृश
पदार्थ आणि एक स्कुटी असा एकूण ६ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखेचे सहाय्यक पोलीस
निरीक्षक सचिन जाधव व पोलीस उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर रोडवर नाकाबंदी केली. या दरम्यान स्कुटीवरून जाणाऱ्या दोन महिलांना थांबवून तपासणी केली असता, त्यांच्याकडील पिशवीत १० किलोपेक्षा जास्त गांजा आढळून आला. पोलिसांनी दोघींना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, हा गांजा महेश गायकवाड (रा. गाडे पिंपळगाव, ता. वैजापूर) याने दिल्याचा खुलासा झाला. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि सुषमा पवार, नारायण पायघन, भावसिंग चव्हाण, सतीश जाधव, देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे, विठ्ठल पवार, छाया लांडगे आणि उज्वला सलामपुरे यांच्या पथकाने केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions